आपलं सांस्कृतिक देखणेपण एका वेगळ्या प्रकाराने सजवून, नटवून लोकांसमोर आणण्यासाठी आणि साडी हा अत्यन्त गोजिरवाणा प्रकार अजून दिमाखदार करण्यासाठी माझ्या मावशीने राजश्री कुलकर्णी हिने राजसी Rajasee हा ब्रँड तयार केला. उत्तर आणि दक्षिण भारतातील मंदिर स्थापत्यातील सुंदर कलाकुसर असणाऱ्या मूर्ती साडीच्या पदरावर चितारुन एक सुंदर कलाकृती निर्माण करणे ही कल्पनाच मुळात फार मोहक आहे. राजसी ब्रँड चा स्टोल ही एक अत्यन्त अप्रतिम कलाकृती आहे. मुळात ही संकल्पनाच फार मोहक असून हा स्टोल हाताळताना तो किती अनमोल आहे याची जाणीव होत राहते. या स्टोलची लांबी, रुंदी, रंगसंगती आणि त्या मुलायम कपड्याचा मऊ स्पर्श याशिवाय आपण याच्याबरोबरच आपला सांस्कृतिक देखणेपणा मिरवत आहोत हे प्रकर्षाने जाणवते. अशाच उत्तम कलाकृती साड्या आणि इतर प्रकारातून राजसी च्या टीम कडून घडत राहोत याच सदिच्छा! शिवाय या स्टोल मधून मला मावशीची माया आणि त्या मायेची ऊब कायम मिळत राहील.
अपर्णा कुलकर्णी