भारतीय संस्कृती आणि कलापरंपरेला आपल्या सौंदर्यदृष्टीने, साड्यांच्या पदरावर चितारणारी टीम राजसी, अभिनंदन आणि शुभेच्छा !
हस्तकला, शिल्पकला यांना आपल्या बुद्धिमत्तेची झालर लावून या साड्या तयार करण्यात आल्या आहेत. प्राचीन भारतीय कलांचा सुरेख आविष्कार म्हणजे राजसी.
आपण, साडीप्रेमी स्त्रिया/मुली साडी निवडताना साडीचा पोत आणि पदर पाहतो. साडीचा पदर खांद्यावर टाकून त्याचा फॉल कसा पडतोय, हे आपण आवर्जून पहातो. राजसी च्या साड्यांच्या पदरावर शिल्पाचे प्रींटिंग नसुन पेंटिंग केलेले आहे. पदरावर भरतकाम आणि पेंटिंग करताना पदराचा पोत तितकाच उत्तम राहील, तो बिघडू नये, याची पूर्ण खबरदारी टीम राजसीने घेतली आहे; ही मला विशेष आनंदाची आणि समाधानाची बाब वाटते.
राजसी च्या साड्या हातमागाच्या आहेत. या साडयांची निर्मिती कल्पकतेने केलेली आहे. काय केलं म्हणजे आपली साडी अधिक सुंदर दिसेल याचा विचार पूर्णवेळ ह्या निर्मितीमागे असणार यात शंका नाही. म्हणतात ना, की अध्यात्म हे प्रत्येक कलेत दडलेले असते ! भारतीय परंपरेचा विचार केला तर खाण्यापिण्याच्या आणि वस्त्रप्रावरणे, थोडक्यात दैनंदिन जीवनात आध्यात्मिक म्हणजे इथल्या मूळ तत्त्वज्ञानाचा धागा सापडतो. त्याचाच आविष्कार म्हणजे राजसी च्या साड्या ! त्यांची प्रत्येक साडी आत, खोलवर आनंद देऊन जाते. कला ही मेडिटेशन असते हे मनोमन पटविणारा आनंद!
या मग अशी ही सुंदर कल्पकतेने नटलेली साडी नेसून आपल्या भारतीय संस्कृतीचा सोहळा साजरा करुया.
राजसी ची कर्तीकरविती डॉ. राजश्री महेश कुलकर्णी आणि राजसी कुटुंबाचे आभार आणि खूप खूप शुभेच्छा..
रधिका यादव