एखादे स्वप्न, एखादी इच्छा, एखादे आकर्षण कितीही दिवस, महिने, वर्षे मनाच्या तळाशी पडून असू शकते, कालौघात ते नष्ट होत नाही, आपल्याला त्यांचा विसर पडलेला असतो फक्त.
कोरोना काळात सक्तीच्या लॉक डाऊनमुळे कित्येकांच्या निद्रिस्त स्वप्नांना, ईच्छांना, आकर्षणांना मोकळा श्वास घेण्याईतपत वेळ मिळाला. संधी मिळाली.
कलासक्त मनाची मैत्रीण प्रा. राजश्री पाटील-कुलकर्णी, हिच्याही मनाच्या कप्प्यात निद्रिस्त असलेल्या भारतीय शिल्पांबद्दलच्या आकर्षणाने लॉक डाऊन काळात अशीच उसळी मारली. आणि तिने मिळालेल्या अवकाशाचे सोने करत त्यास आकार देण्याचे ठरवले.
त्यातून जन्मास आला साड्यांचा एक नवा ब्रॅण्ड.
राजसी
हातमागावर वीणलेल्या, निरनिराळी भारतीय शिल्पे उतरवून राजस रुप प्रदान केलेल्या देखण्या साड्यांचे संकलन.
अफाट मेहनतीने राजश्रीने आपल्या स्वप्नांना न्याय दिला आहे. अफलातून काम आहे तिचे आणि तिच्या संपूर्ण टिमचे.
उच्च अभिरुची संपन्न साडीचा पोत, कुशल भरतकाम, शिल्पांच्या प्रतिमा, पेंटींग्ज पाहील्यावर भारतीय संस्कृतीचा आरसा वाटणारा हा राजसी साड्यांचा ब्रॅंड देशातच नाही तर परदेशातही लवकरच नाव कमावेल अशी खात्री वाटते.
राजसी च्या संकेतस्थळाचे रितसर उद्घाटन आज NCPA, Nariman point येथे मा. मनिषा म्हैसकर (भा.प्र. से) तसेच आयुक्त अभिनय कुंभार यांच्या हस्ते पार पडले.
या उद्घाटन सोहळ्यास राजश्रीने आमंत्रित केल्याने मला एका देखण्या कार्यक्रमाचा भाग होता आले, सोबतच राजस्थानी लोकसंगीताचा आस्वाद घेता आला.
राजसी बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.rajasee.com या website ला भेट द्या.
शशी डंभारे