Rajasee

भारतीय पारंपारिक शिल्प

भारतीय पारंपारिक शिल्प अशी थीम असलेल्या, हातमागावर विणलेल्या, हाताने रंगविलेल्या, हाताने एम्ब्रॉडरी केलेल्या, प्रत्येकी सुंदर नाव ल्यालेल्या साड्यांची, राजसी या ब्रॅंडची वेबसाईट www.rajasee.com काल एका देखण्या कार्यक्रमात उद्घाटन होऊन सर्वांसाठी खुली झाली.
त्या वेळी प्रमुख पाहुणे मा. श्रीमती मनीषा म्हैसकर (भा.प्र.से.) आणि मा. श्री अभिनय कुंभार (आयकर आयुक्त) यांच्या हस्ते राजसी या अभिनव संकल्पनेच्या निर्मितीतील योगदानाबद्दल सन्मान प्राप्त झाला. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की या दोन्ही उच्चपदस्थ अधिकार्‍यांना कलेमध्ये अभिरुची आणि कलेची उत्तम जाण आहे.
मी राजसीच्या टिमसोबत शिल्पांची व शिल्पांच्या चित्रांची जाण असलेला कलाकार म्हणून सुरवातीपासून जोडला गेलो. मी आणि डॉक्टर राजश्री पाटील कुलकर्णी Rajshree Kulkarni आम्ही मुंबई विद्यापीठात भारतीय सौंदर्यशास्त्र शिकताना सहविद्यार्थी होतो. भारतीय पारंपारीक कलाकृतींबद्दल दोघांनाही असलेले आकर्षण फार जुने आहे. प्राध्यापक असलेल्या राजश्रीच्या मनात केव्हाच्या घोळणार्‍या या कल्पनेला लॉकडाऊनच्या स्थीर काळात अंकुर फुटले. बघता बघता कामाचा अवाका, टिमचा आकार विस्तारत गेला… आणि फार मोजक्या डोळ्यांनी पाहिलेले हे काम शनिवारी सर्वांसाठी खुले झाले.
आपण सर्व कला रसिक भारतीय शिल्पकलेतली सौंदर्य स्थळे जाणून आहोतच. आता हे सौंदर्य आपल्या साडीवर मिरविण्याची संधी महिलांना आणि स्टोलस् च्या माध्यमातून पुरुषांना उपलब्ध झाली आहे.
संपूर्ण टिम राजसीचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा !!!

वैभव राऊत

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *